नवी दिल्ली : वृतससंस्था
प्रत्येक व्यक्ती बागेत उत्तम वातावरण असते यासाठीच फिरायला जात असता, पण एका तरुणीला बागेत फिरणे जीवावर बेतले आहे. हि घटना पाकीस्तानमध्ये घडली आहे.
जेव्हा ती तरूणी तिच्या मित्रासोबत एका बागेत फेरफटका मारण्यासाठी गेली होती. त्या बागेत अचानक काही लोकांनी बंदुकीचा धाक दाखवून त्या तरूणीचे अपहरण केले. त्यानंतर तिला जंगलात घेऊन जाण्यात आले आणि बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला. इतकेच नव्हे तर त्यानंतर त्या नराधमांनी त्या तरूणीला हजार रूपये देऊन, ‘अशीच इकडे तिकडे फिरू नकोस’ असे सांगितल्याचेही समजले.
वास्तविक, ही घटना पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील F-9 परिसरात असलेले पार्क सर्वात सुरक्षित पार्क मानले जाते. ही तरुणी तिच्या मित्र-मैत्रिणीसोबत पार्कमध्ये पोहोचली होती आणि त्याच वेळी दोन नराधमांनी बंदुकीच्या धाकावर तिचे अपहरण केले. ही घटना गुरुवारी रात्री घडली. बंदूकधारी हल्लेखोरांनी बंदुकीच्या जोरावर दोघांना जवळच्या घनदाट जंगलात नेले आणि त्यांना वेगळे केले. यानंतर नराधमांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. त्याने मित्रालाही मारहाण केली आणि त्यानंतर तरूणीला एक हजार रुपये दिले आणि ‘असे फिरणे योग्य नाही’ असे सांगितले. या घटनेनंतर तरुणीने पोलीस ठाणे गाठून संपूर्ण हकीकत सांगितली. दुसर्या मीडिया रिपोर्टनुसार, ज्या भागात ही घटना घडली तो F-9 हा परिसर आहे, जो इस्लामाबादमधील सर्वात सुरक्षित पार्क मानला जातो. या ठिकाणी सुरक्षिततेसाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे पोलीसही याचा तपास करत आहेत.