धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील निशाणे येथील ग्रामपंचायत सदस्य व कापसाचे व्यापारी शरदभाऊ पाटील यांची जळगाव जिल्हा बाळासाहेबांची शिवसेना शेतकरी सेनेच्या उपजिल्हा प्रमुख पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. शरद पाटील यांनी राष्ट्रवादी युवा उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देऊन बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते पी एम पाटील सर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला. ते दहा वर्षापासून राष्ट्रवादी युवा उपजिल्हा प्रमुख पदावर कार्यरत होते शरद पाटील यांचा कापसाच्या उद्योगामुळे पूर्ण जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांशी संबंध येतो त्यामुळे पक्ष वाढण्यासाठी व शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी त्यांच्यावर शेतकरी सेनेची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
यांच्या निवडीबद्दल जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.गुलाबराव पाटील साहेब,जिल्हा प्रमुख निलेशभाऊ पाटील, बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते पी एम पाटील सर, युवकांचे प्रेरणास्थान प्रतापराव पाटील,मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंदभाऊ नन्नवरे,विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, तालुका प्रमुख गजानन नाना पाटील,मुख्यमंत्री सहायता निधीचे जिल्हा समन्वयक पप्पूभाऊ भावे,युवा उपजिल्हा प्रमुख भैयाभाऊ महाजन, शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख विनायक महाजन, धरणगाव तालुका संघटक हेमंतभाऊ चौधरी, तालुका प्रमुख संजय चौधरी,शहर प्रमुख विलासभाऊ महाजन,महिला शहर प्रमुख भारतीताई चौधरी, तालुका प्रमुख प्रिया इंगळे,शेतकरी सेनेचे शहर प्रमुख सत्यवान कंखरे, युवा उपजिल्हाधिकारी बंटीभाऊ पाटील,युवा तालुका प्रमुख दीपक भदाणे,युवा उपजिल्हा संघटक मराठे सर,महिला उप तालुका प्रमुख पुष्पाताई पाटील, मागासवर्ग तालुका प्रमुख मायाताई देवरे जळगाव जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले.