प्रतिनिधी(लक्ष्मण पाटील) येथील पष्टाणे खु. गावात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसाच्या निमित्ताने “कवयित्री बहिणाबाई चौधरी ग्राम वाचनकट्टा” चे उदघाटन २८ रोजी करण्यात आले.
प्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे यांच्या हस्ते आणि डॉ. के. एम.पाटील, एन. एस. एस. चे विभागीय समन्वयक डॉ. एस. बी. शिंगाणे सरपंच शिवाजी देवचंद भिल, माजी सरपंच किशोर निकम यांच्या हस्ते करण्यात आले.
वाचन म्हणजे केवळ पुस्तकं वाचन नाही तर आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असणारे साधन असल्याचे प्रतिपादन प्रा. आंधळे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
सदर ग्राम वाचन कट्ट्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जवळील सामाजिक, आर्थिक, चरित्रात्मक, स्पर्धा परीक्षाविषयक 100 पुस्तके भेट म्हणून दिलीत. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. बी. शिंगाणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गौरव महाजन यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. डी. आर. बोंडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे प्राचार्य, उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. डी. आर. बोंडे, डॉ. ए. ए. जोशी, डॉ. सी. एस. सुखदाणे, डॉ. पी. एस. बोरसे, प्रा. व्ही. वाय. वळवी, डॉ. एस. एम. खरे, डॉ. जी. जी. जाधव, डॉ. एस. एच. वाघमारे, प्रा. एच. ए. भालेराव यांनी परिश्रम घेतले. तसेच या कार्यक्रमाला ग्रामसेवक देवरे, ग्रा. प. सदस्य मुरलीधर पाटील, अभय पाटील, संजय पाटील, अमोल पाटील, मनोज वाघ, विजय पाटील, वसंत पाटील, रामकृष्ण पाटील, भगवान पाटील, पष्टाणे खु. गावातील ग्रामस्थ, तरुण, विद्यार्थी, महिला उपस्थित होते.