अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पातोंडा जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय अमळनेर येथे नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमळनेर येथील आंतरवासिता प्रशिक्षक विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन उपक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यात आला.
जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर येथे नवलभाऊ प्रतिष्ठान संचालित शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमळनेर येथील छात्राध्यापकांचा आंतरवासिता उपक्रम सुरू आहे. आंतरवासिता उपक्रमांतर्गत छात्र अध्यापकांनी शालेय स्तरावर मुख्याध्यापकांच्या परवानगीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन नानासो डी डी पाटील, प्रमुख पाहुणे श्री ज्ञानेश्वर कोळी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे चिटणीस तुषार संदानशिव. मुख्याध्यापक श्री के डी पाटील प्रा. यु.बी. पाटील, प्रा. डॉ.जितेश चव्हाण पर्यवेक्षक सोनवणेसर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनात शाळेतील इ. पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदवला. त्यात एटीएम मशीन, सौर ऊर्जा, पाण्याची बचत, गणितातील कोडे, यांसह रसायनशास्त्र भौतिकशास्त्र व जीवशास्त्र यावरील विविध उपक्रमांची मांडणी विद्यार्थ्यांनी केली होती. अध्यक्ष भाषणात श्री डी.डी.पाटील यांनी आजच्या युगात विज्ञानाचे महत्त्व, विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती, स्वयंप्रेरणे अध्ययनास प्रोत्साहन, वाचाल तर वाचाल यासारखे विविध उदाहरणांचे दाखले देऊन विज्ञान प्रदर्शनाचे महत्त्व विशद केले.विज्ञान प्रदर्शन भरवणे हे महत्वाचे आहे कारण हे तरुण पिढीला विज्ञानाच्या मार्गाकडे नेते म्हणजेच या प्रकारच्या प्रदर्शनामुळे तरुणांच्या मनामध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण होते आणि जर मुलांच्यामध्ये विज्ञान विषयी आवड निर्माण झाली तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारची विज्ञान विषयाची माहिती जाणून घेण्यास आवडेल. तसेच ते नवनवीन गोष्टी करण्यास प्रोत्साहित होतात आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारची विज्ञान प्रदर्शन भरवणे गरजेचे असते. ज्या मुलांना आवड आहे ती काहीतरी नवीन कल्पना घेवून स्पर्धेमध्ये किंवा प्रदर्शनामध्ये येतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या कल्पना मिळतात तसेच लोकांना देखील वेगळ्या प्रकारची माहिती मिळते आणि माहिती घेणाऱ्या व्यक्तीला ते चांगल्या प्रकारे समजू शकते तसेच त्यांना ते समजावून घेन्यासाठी मनोरंजक देखील वाटेल कारण विज्ञान प्रदर्शनामध्ये संबधित प्रकल्पाची प्रातेक्षित दाखवली जातात. असे मत उद्घाटन प्रसंगी अध्यक्षिय भाषणात मा. नानासो डी.डी.पाटील यांनी व्यक्त केले.
आजचा विद्यार्थी हा विविध कलागुणांनी संपन्न असतो त्या विद्यार्थ्यांमधील सुप्तगुण शोधण्याचे कार्य शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले. प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून असेच नवनवीन उपक्रम राबवावे अशी आशा व्यक्त केली.
कार्यक्रमात बी एड कॉलेजचे प्राध्यापक यू बी पाटील व डॉ. जे. एन.चव्हाण यांसह राहुल वाडीले, उन्मेष पाटील, जिग्नेश पाटील, तुषार पाटील, विजय पाटील, मिलिंद पाटील, मोहिनी पाटील, कविता पाटील, मिनाक्षी पाटील, प्रचिती पाटील, आरती नाईक, माधुरी पाटील, माधुरी पाटील, राहुल वाडीले, उन्मेष पाटील, मोहिनी पाटील, कविता पाटील, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिग्नेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन राहुल वाडीले यांनी केले.