Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नव्या नवरीचा कारनामा : सासरच्याना विष देवून फरार !
    क्राईम

    नव्या नवरीचा कारनामा : सासरच्याना विष देवून फरार !

    editor deskBy editor deskFebruary 8, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    देशातील नुकतेच लग्न झाल्यावर नवरी फरार होण्याच्या घटना नेहमी घडत आहेत. उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये नव्या नवरीने एक खतरनाक कारनामा केला आहे. लग्न करून मरूधर एक्सप्रेसने सासरी जात असलेल्या नवरीने रेल्वेतच सासरच्या लोकांना विष दिलं आणि संधी बघून फरार झाली. घटनेनंतर सासरच्या लोकांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या सगळ्यांची स्थिती चांगली आहे.

    मीडिया रिपोर्टनुसार, सकाळी 7 वाजता रामफल गावाजवळ 3 लोक रेल्वे रूळावर दिसून आले. त्यांची रेल्वे स्टाफने मदत केली. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. असं सांगण्यात आलं की, त्यांच्यासोबत असलेल्या नवरीने सगळ्यांना काहीतरी खाण्यासाठी दिलं. ज्यानंतर त्यांची तब्येत बिघडली.

    मीडिया रिपोर्टनुसार, मरूधर एक्सप्रेसने वाराणसीहून जयपूरकडे एक परिवार जात होता. परिवारासोबत नवी नवरी होती. परिवाराला नव्या नवरीने प्रवासात नशेचा पदार्थ मिक्स करून काही खाण्यास दिलं. ज्यामुळे सगळे लोक बेशुद्ध झाले. सगळ्या लोकांना रामफळ गावाजवळ रेल्वे रूळाच्या बाजूला उतरून देण्यात आलं.

    रेल्वे कर्मचाऱ्यांनी पीडित परिवाराला आग्रा फोर्ट स्टेशनला आणलं. त्यांना उपचारासाठी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तेच पीडित परिवाराने सांगितलं की, ते बनारसहून जयपूरला जात होते. त्यांच्यासोबत नवी नवरी होती. तिने आम्हाला काहीतरी खाण्यासाठी दिलं. ज्यामुळे आम्ही बेशुद्ध झालो. असं वाटतं या लग्नामुळे नवरी आनंदी नव्हती. त्यामुळे तिने हे कृत्य केलं. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.