जगभरात सर्वत्र व्हॅलेंटाईन वीक म्हणजेच प्रेमाचा आठवडा सुरू झाला आहे मित्रांनो. व्हॅलेंटाईन वीकमधील दुसरा दिवस प्रपोज डे म्हणून साजरा केला जातो. प्रपोज डेच्या दिवशी प्रेमी एकमेकांशी आपल्या हृदयातील गोष्टी बोलतात. हा दरवर्षी फक्त 8 फेब्रुवारीला साजरा केला जातो. प्रपोज डे ला खूप महत्व आहे. या दिवशी लोक त्यांच्या मनातील भावना आपल्या आवडत्या व्यक्तीला सांगण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अनेकांना त्यांच्या मनातील गोष्टी सांगता येत नाही. यासाठी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी अशाच काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर मनमोकळेपणाने बोलू शकाल.
प्रपोज डे का साजरा करतात?
प्रपोज डे साजरा करण्यामागे कोणतीही ऐतिहासिक कथा नाही. वर्षानुवर्षे पाश्चिमात्य संस्कृतीत प्रपोज डे साजरा केला जात आहे. पण, आता जवळपास प्रत्येक देशात तो आधुनिक पद्धतीने साजरा केला जातो. तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तीसमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवणं खूप अवघड काम आहे. म्हणूनच लोक विशिष्ट दिवसाची वाट पाहत असतात. फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना मानला जातो आणि जेव्हा प्रेम सप्ताह सुरू होतो तेव्हा प्रेम व्यक्त करण्याचाही हा सर्वोत्तम काळ असतो. त्यामुळे व्हॅलेंटाईन वीकच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 फेब्रुवारीला प्रपोज डे साजरा करण्याची प्रथा सुरू झाली.