जळगाव : प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यापासून शिंदे गटात जळगाव जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात प्रवेश करीत आहे, तर जिल्ह्यात शिंदे गटाचे बळ अधिक वाढत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. आज हि जांभोरे गावातील तरुणांनी प्रवेश केला आहे.
जांभोरे गावातील तरुणांनी आज मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामध्ये अतुल जिजाबराव पाटील, विजय विलास कोळी, विशाल गोविंदा गुजर, अमोल पितांबर हटकर, वैभव राजेंद्र पवार, महेश दीपक हटकर, गणेश देवा गवळी, अजय शरद कोळी, या सोबत युवासेना विभाग प्रमुख शुभम चौहान, व जांभोरे शाखाप्रमुख अमोल सोनवणे यांचा समावेश आहे. तर मंत्री पाटील यांनी त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला आहे.