अनेक तालुक्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार
जळगांव जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा पाणीपुरवठा सह शेती शिवार ज्या पाणीवर अवलंबून असलेले गिरणा धरण (Girna dam) रात्रीपासून सुरु असलेल्या सतत धार पावसामुळे आज ८० टक्के भरले असून जिल्यातील पाच तालुक्यासह शेतीचा देखील काही प्रमाणात पाणी प्रश्न मिटला आहे.
चाळीसगाव, भडगाव, पाचोरा , एरंडोल ,धरणगाव व अमळनेर सह जळगाव जिल्ह्यातील काही गावांना पाणीपुरवठा करणारे गिरणा धरण शंभरीकडे वाटचाल करत आहे, काल नाशिक जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे गिरणा धरण 80 टक्के भरले आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.