अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी मारवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर तालुक्यातील मारवाड पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या एका गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि ६ रोजी अनोळखी इसमाने अल्पवयीन मुलीच्या घरातून काही तरी फूस लावीत तिला पळवून नेल्या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने मारवाड पोलीस स्थानक गाठत अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोना सुनील तेली हे करीत आहेत.