Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » औरंगाबाद हादरल : आईनेच केल दोन मुलांना ठार !
    क्राईम

    औरंगाबाद हादरल : आईनेच केल दोन मुलांना ठार !

    editor deskBy editor deskFebruary 7, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    औरंगाबाद : वृत्तसंस्था 

    आईनेच पोटच्या मुलांचा गळा दाबून त्यांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलांचा आईने झोपेतच जीव घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून हत्येचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.औरंगाबादमध्ये एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

    मुलांची आई मनोरुग्ण असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. औरंगाबादमधील या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद शहरातील सादात नगर परिसरामध्ये दोन अल्पवयीन सख्या बहिणभावाचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

    रात्री आई-वडिलांसोबत जेवण करुन दोघे बहिण-भाऊ घरी झोपले होते. सकाळी दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले. कुटुंबीयांनी दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी दोघा बहिण-भावाला मृत घोषीत केलं. अदीबा फहाद बसरावी, असं मृत 8 वर्षीय मुलीचं नाव आहे. तर अली बिन फहाद बसरावी, असं 4 वर्षीय मुलाचं नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी अदीबा आणि मुलगा अली रविवारी रात्री घरातील लोकांसोबत जेवले आणि त्यानंतर झोपले. दुसऱ्या दिवशी दुपारचे बारा वाजले तरी दोघे खोलीतून बाहेरच आले नाहीत. त्यावेळी त्यांची आई त्यांना उठवण्यासाठी गेली, त्यावेळी दोघेही बेशुद्ध आढळले. दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल केलं पण डॉक्टरांनी मुलांना मृत घोषीत केलं. मुलांचा मत्यू नेमका झाला कसा? याचा शोध घेणं पोलिसांसमोर आव्हान होतं. अखेर पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यावेळी दोन्ही मुलांच्या जन्मदात्या आईनेच रात्री मुलांची गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतलं आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.