Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेमविवाह केल्याच्या रागातून मेहुण्याने भावोजीची केली हत्या !
    क्राईम

    प्रेमविवाह केल्याच्या रागातून मेहुण्याने भावोजीची केली हत्या !

    editor deskBy editor deskFebruary 5, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नंदुबार : वृत्तसंस्था 

    बहिणीला पळवून नेत प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका मेहुण्याने आपल्याच भावोजीची हत्या केल्याची घटना नंदुबारमध्ये घडली आहे.

    नंदुरबार शहरातील मच्छी बाजार चौकात राहणाऱ्या एका मुलीने दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला होता. त्यानंतर ती मुलगी आपल्या पतीसोबत राहत होती. बहिणीने पळून जाऊन लग्न केलं याचा राग भावाचा मनात होता. याच रागातून त्याने बहिणीच्या नवऱ्याला भर बाजारात गाठले आणि त्याची धारधार शस्त्राने भोसकून हत्या केली.

    शहरातील अतिशय वर्दळीचा समजल्या जाणाऱ्या मच्छी बाजार परिसरात ५ फेब्रुवारी शुक्रवारी रात्री उशीरा ही घटना घडली. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान घटनेनंतर आरोपी हा स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. त्याला पोलिसांनी अटक केली असून खबरदारीचा उपाय म्हणून नंदुरबारमध्ये शनिवारी अतिरिक्त कुमकसह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सध्या परिसरात शांतता आहे. दरम्यान, हत्या केल्यानंतर तरुणाने पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी भावाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तणापूर्ण वातावरण आहे. नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.