Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुण होता महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये अन उचलले टोकाचे पाऊल !
    क्राईम

    तरुण होता महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये अन उचलले टोकाचे पाऊल !

    editor deskBy editor deskFebruary 5, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    औरंगाबाद : वृत्तसंस्था 

    आज कालचे तरुण लग्नापेक्षा जास्त  ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहणे पसंद करीत आहे. पण यात तरूण असतानाही एका महिलेसोबत रहाणे तरुणाला मोठे घातक ठरले आहे. औरंगाबाद शहराच्या बालाजीनगर परिसरात धक्कादायक घटना समोर आली असून, एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे, आत्महत्या करणारा तरुण एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होता. दरम्यान, शनिवारी सकाळी जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दातील बालाजीनगर भागांत त्याने आत्महत्या केली आहे. मुकेश नागोराव गव्हांदे (वय 30 वर्षे, रा. चौंढी टाकळेश्वर, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा) असे या युवकाचे नाव आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, मुकेश गव्हांदे हा युवक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य महाविद्यालयात एम. ए. (अर्थशास्त्र) चे शिक्षण घेत होता. तर महाविद्यालयाच्या वल्लभी वसतिगृहात तो राहत होता. केटरिंगचे काम करून तो शिक्षण घेत होता. केटरिंगचे काम करीत असतानाच तिथे काम करत असलेल्या एका महिलेसोबत त्याची ओळख झाली. दरम्यान, काही महिन्यांपासून ते दोघे बालाजीनगर भागांत एक खोली किरायाने घेऊन लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागले.

    मात्र, शनिवारी सकाळी मुकेशने आपण राहत असलेल्या याच खोलीतील लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी सोबत राहणारी महिला घरामध्येच झोपलेली होतो, असे महिलेने पोलिसांना सांगितले आहे. झोपेतून उठल्यानंतर आपल्याला ही बाब दिसून आली. या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मुकेशला घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले, असल्याची माहिती महिलेने दिली आहे. दरम्यान, मयताचा लहान भाऊ लखन याने सांगितले की, संबंधित महिला मुकेशला ब्लॅकमेल करत होती. सोबत न राहिल्यास मारण्याची धमकी देत होती. तिच्या धमक्यांना कंटाळूनच त्याने हे पाऊल उचलले असावे किंवा संबंधित महिलेनेच त्याला मारून टाकले असावे, अशी शंकाही त्याने उपस्थित केली. या प्रकरणी लवकरच पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचंही मृत मुकेशच्या भावाने सांगितले. सध्यातरी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास जवाहरनगर पोलीस करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.