• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव तहसील कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 28, 2021
in धरणगाव, सामाजिक
0
धरणगाव तहसील कार्यालयात  माहिती अधिकार दिन साजरा !

धरणगाव प्रतिनिधी (लक्ष्मण पाटील) येथील तहसिल कार्यालयात माहिती अधिकार दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तहसिलदार नितीनकुमार देवरे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पाटील यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ बाबत माहिती दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुचनेनुसार माहिती अधिकार कायद्याच्या बाबतीत जनजागृती व्हावी या हेतूने धरणगाव तहसिल कार्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी माहिती अधिकार कायद्याची प्राथमिक माहिती दिली. ६ ते १२ ऑक्टोबर दरम्यान माहिती अधिकार सप्ताह साजरा करण्यात यावा परंतु त्याआधी सर्व प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात यावा, अशा सूचना प्रास्ताविकातून व्यक्त केल्यात. या कार्यक्रमात ई – पीक पाहणीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ४ तलाठ्यांना जिल्हाधिकारी साहेबांची स्वाक्षरी असलेले सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये तलाठी विरेंद्र सोनकांबळे, सचिन कलोरे, प्रज्ञा खंडेराव, बसवेश्वर मजगे यांचा सन्मान झाला.

प्रमुख वक्ते लक्ष्मण पाटील यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ ची पार्श्वभूमी व कायद्याच्या तरतुदी साध्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. प्रशासन व जनता यांच्यात समन्वय असला तर कामे सुलभ होतात. सामान्य माणसाचे काम झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान हिच आपल्या कामाची पावती असते असे मत लक्ष्मण पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी तहसिलदार नितीनकुमार देवरे, Sto योगेश कुंजीर, तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक बंधू – भगिनी उपस्थित होते. या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य रविंद्र कंखरे यांनी केले.

Previous Post

पथराड येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

Next Post

धरणगावात थोर क्रांतिकारी भगतसिंग यांची जयंती उत्साहात साजरी !

Next Post
धरणगावात थोर क्रांतिकारी भगतसिंग यांची जयंती उत्साहात साजरी !

धरणगावात थोर क्रांतिकारी भगतसिंग यांची जयंती उत्साहात साजरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group