धरणगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना युवासेना मोठ्या जोशात ना.गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात संघटीत होत असून नवनियुक्तीहि जाहीर होत आहे. तर नुकतीच युवसेनाच्या तालुका प्रमुख जाहीर करण्यात आले. यामध्ये असोदा येथील अजय सुभाष महाजन तर रामकृष्ण परशुराम काटोले यांची जळगाव तालुका युवासेना तालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली.
अजय महाजन व रामकृष्ण परशुराम काटोले यांची निवड पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार करण्यात आलेली आहे. तर निवडीबद्दल प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांनी अभिनंदन केले आहे.