नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात नाशिक शहरात वाढत चाललेली असून यावर कुठलाही आळा बसत नाही नुकतीच गंगापूररोड भागात मद्यपान सेवन करण्यास मनाई केल्याने संतप्त पतीने झोपेत असलेल्या पत्नीवर चाकू हल्ला केला. स्वप्निल पिंपळे (४० रा.सुयोजीत गार्डन) असे पत्नीवर हल्ला करणा-या संशयित पतीचे नाव आहे.
याप्रकरणी याप्रकरणी मानसी पिंपळे यांनी तक्रार दाखल केली असून गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळे यांना मद्यपानाचे सवय असून ते गुरूवारी (दि.२) रात्री दारूच्या नशेत घरी गेल्याने ही घटना घडली. पती दारू पिवून आल्याने या दांम्पत्यात वाद झाला. यावेळी पत्नीने दारूमुळे मुलांवर विपरीत परिणाम होतो असे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पत्नी झोपी गेली असता संशयिताने पत्नीच्या गालावर आणि हाताच्या पंजावर चाकूने वार केला. अधिक तपास हवालदार खुळात करीत आहेत.