• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

डमी मालक दाखवीत प्लॉट विक्री करणारी टोळी अटकेत !

editor desk by editor desk
February 3, 2023
in क्राईम, जळगाव
0
डमी मालक दाखवीत प्लॉट विक्री करणारी टोळी अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी 

बाहेरगावी राहणार्‍या जागा मालकांना हेरुन त्यांच्या नावाचे बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार करीत त्यांच्या जागी बनावट व्यक्ती उभी करुन कमी पैसे घेवून जागा खरेदी करुन देणार्‍या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. याप्रकरणी एका महिलेसह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील अयोध्या नगरात बखळ तीन प्लॉट अनिल राजेंद्र नेहते यांच्या नावावर असून त्या सध्या कामानिमित्त नाशिक येथे राहतात. त्यांचा सुमारे 2 कोटी रुपयांचे प्लॉट राजू जगदेव बोबडे, प्रमोद वसंत पाटील व गंगा नारायण जाधव हे तिघे कमी पैसे घेवून ज्या व्यक्तीच्या नावावर प्लॉट आहे. त्यांचे बनावट बनावट आधार कार्ड व पॅनकार्ड तयार करुन विक्री करीत कमी पैशांमध्ये प्लॉटची बनावट खरेदी करुन देत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली.

त्यांनी लागलीच पथक तयार करुन संशयितांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. हे तिघ संशयित ऑटो नगरातील हॉटेल संदीप जवळ असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यांनी लागलीच त्याठिकाणी धाव घेवून संशयित राजू जगदेव बोबडे (वय-42, रा. विठ्ठल रुख्माई मंदिर विटनेर), प्रमोद वसंत पाटील (वय-46, रा. विरावली ता. यावल) व महिला गंगा नारायण जाधव (वय-42, रा. अयोध्या नगर) या तिघांना ताब्यात घेतले ताब्यात घेतले. यातील राजू बोबडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी, रामानंदनगर व शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.कामानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेल्या लोकांच्या नावावरील प्रॉपर्टी बघून त्या कोणाच्या नावावर आहेत. याबाबतची माहिती राजू बोबडे व प्रमेद पाटील हे गोळा करीत होते. त्यानंतर त्यांच्या जागी बनावट मालक तयार करुन त्यांच्या मूळ मालकाचे बनावट कागदपत्रे तयार करुन त्या कमी पैशांमध्ये विक्री करणे हा त्यांचा धंदा असल्याने अशा प्रॉपर्टींवर त्यांचा डोळा होता.

नाशिक येथे स्थायिक झालेल्या अनिता नेहते यांच्या नावावर अयोध्या नगरात 2 कोटी रुपयांचे तीन प्लॉट होते. त्यांनी त्यांचे बनावट कागदपत्र तयार करुन त्यांच्या जागी गंगा जाधव ही बनावट महिला उभी करुन त्यांचा प्लॉट खरेदी करुन देणार होते. परंतु त्यापुर्वीच एलसीबीच्या पथकाने या टोळीचा पर्दाफाश केला. त्यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, संदीप सावळे, अभिलाषा मनोरे, विजय पाटील, रविंद्र पाटील, ईश्वर पाटील, दर्शन ढाकणे, मोतीलाल चौधरी यांच्या पथकाने केली.

Previous Post

रुग्णाने केला डॉक्टरावर हल्ला ; पोलिसात गुन्हा दाखल !

Next Post

शरद पवारांना माहित होत शिवसेना फुटणार : अजित पवार !

Next Post
शरद पवारांना माहित होत शिवसेना फुटणार : अजित पवार !

शरद पवारांना माहित होत शिवसेना फुटणार : अजित पवार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !
क्राईम

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !

June 1, 2025
जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !
क्राईम

जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !

June 1, 2025
जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त  !
क्राईम

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त !

June 1, 2025
व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group