लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: तालुक्यातील आव्हाने येथील बस फेऱ्या बंद असल्याने नागरिकांना त्यातून प्रवास करावा लागत आहे यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी घे शहरात शिक्षण घेण्यासाठी ये-जा करीत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे याकरिता जळगाव ते आव्हाने बस फेरा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे बस आगारात निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील आव्हान हे गाव पंधरा हजार लोकवस्तीचे आहे या गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात जळगाव शहर नोकरीनिमित्त दररोज ये-जा करीत असतात यात विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.मागील दीड वर्षापासून एसटी बसेस बंद असल्यामुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. गावातील बहुसंख्य विद्यार्थी हे शहरात शिकण्यासाठी येत असतात शहरात येण्या-जाण्यासाठी त्यांना दोन वेळा रिक्षा बदलावी लागते. यामध्ये वित्त व वेळ दोघांचा अपव्यय होतो त्यामुळे लोकांची गैरसोय टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव तालुक्यात बस व्यवस्थापक यांना बसेस लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष बापू दादा परदेशी , राष्ट्रवादी तालुका युवक उपाध्यक्ष रवि सर,माजी सरपंच बोरणार पिंटू भाऊ, चेतन कोळी, प्रमोद सोनवणे व अतुल चौधरी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.