अवघ्यां दोनशे रुपयांची लाच पोटगी देण्याची मुदत वाढवून देण्यासाठी मागणाऱ्या जळगाव कौटुंबिक न्यायालयातील सहा.अधीक्षकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली .
गुरुवारी दुपारी पाच वाजेच्यास सुमारास जळगावातील न्यू बीजे मार्केटमधील कौटूंंबिक न्यायालयाच्या वरच्या माळ्याजवळील गोविंदा कॅन्टीनजवळ हा सापळा यशस्वी करण्यात आला. हेमंत दत्तात्रय बडगुजर (जळगाव) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्यांनी हि कारवाई केली.
तक्रारदार याच्या तक्रारीत म्हटले आहे कि , एका दाम्पत्यातील कौटुंबिक वाद सुरू असून त्यांनी पत्नी नांदण्यास येण्यासाठी दावा केला आहे तर पत्नीने मात्र पोटगीचा दावा दाखल केल्यानंतर न्यायालयाने तो मंजूर केला आहे. पत्नीला एकरकमी रक्कम देण्याचे न्यायालयाने दिल्यानंतर तक्रारदार हे काही रक्कम दरमहा देत आले मात्र रक्कम देण्यास काही कारणास्तव विलंब झाल्याने ही एकरकमी रक्कम तत्काळ जमा करावी याबाबत न्यायालयाने काढले होते. पोटगी देण्याची रक्कम मुदत वाढवून देण्यासाठी तक्रारदाराने सहा.अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर त्यांनी गुरुवारी दोनशे रुपये लाचेची मागणी केल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. लाच पडताळणीनंतर सापळा रचण्यात आला. संशयीताने न्यू बी.जे.मार्केटमधील वरच्या माळ्याजवळील गोविंदा कॅन्टीनजवळ रक्कम देण्यास तक्रारदाराला सांगितले व लाचेची रक्कम स्वीकारताच तक्रारदाराने दिलेला इशारा मिळताच पथकाने संशयीताला रंगेहात पकडले.