लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून जळगाव जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट दिला होता सोमवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरी आणि तितूर नदीला पुर आला आहे.चाळीसगाव शहरातील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. यामुळे अलीकडेच आलेल्या महापूराच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत.
याबाबत वृत्त असे की हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यातील काही भागात रेट अलर्ट जाहीर केले होते मुसळधार पाऊस होईल याची चेतावणी दिली होती सोमवारी रात्री चाळीसगाव शहरासह तालुक्यातील बहुतांश भागांमध्ये जोरदार वृष्टी झाली. यामुळे तितूर आणि डोंगरी नद्यांसह परिसरातील सर्व नाल्यांना मोठा पूर आला आहे. विशेष बाब म्हणजे डोंगरी आणि तितूर या दोन्ही नद्यांना एकाच महिन्यात पाचव्यांदा पूर आलेला आहे. चाळीसगाव शहराच्या मधून जाणार्या नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे येथील रहदारी बंद झालेली आहे. तर काही भागांमध्ये पाणी शिरल्याची माहिती देखील समोर आली आहे.
यापूर्वी ३० ऑगस्टच्या रात्री झालेल्या ढगफुटीमुळे चाळीसगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली होती. यानंतरही पावसाचे प्रमाण वाढतच राहिले आहे.