जळगाव : प्रतिनिधी
शहरातील विवाहितेला तिच्याच पतीने वर्षभरापासून अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी पती विरोधात शनिपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा पतीला हैवानच म्हणावे लागेल
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एका परिसरात ३० वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह राहायला आहे. ३५ वर्षीय पती हा तिला दि २७ जानेवारी २०२२ पासून वेळोवेळी अनैसर्गिक कृत्य करण्यास बळजबरी करीत आहे. त्याला त्या विवाहितेने विरोध केला असता तिला शिवीगाळ व मारहाण करीत तु जर हे कृत्य मला करू दिले नाही तर तुला मारून टाकेल अशी देखील धमकी देत असल्याने विवाहितेने १ फेब्रुवारी २०२३ रोजी शनिपेठ पोलिसात धाव घेत पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मपोउपनिरी प्रिया दातीर हे करीत आहेत.