नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारकडून आज सादर झालेल्या अर्थसंकल्पमध्ये अनेक गोष्टीचा बदल केला आहे. यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. टॅक्स स्लॅबमध्ये कपात ही सर्वात मोठी घोषणा आहे. सरकारने जुनी करप्रणाली रद्द केली. यादरम्यान अर्थमंत्र्यांनी कोणत्या वस्तू स्वस्त केल्या जात आहेत आणि कोणत्या वस्तू महाग होत आहेत हे देखील सांगितले आहे.
अर्थसंकल्पात कस्टम ड्युटीबाबत सरकार काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज आपल्या भाषणात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, लिथियम-आयन बॅटरीच्या निर्मितीसाठी कस्टम ड्युटीमध्ये सूट दिली जाईल. याशिवाय टेक्सटाइल वगळता मूळ कस्टम ड्युटी दर २१ वरून १३ पर्यंत कमी केला जाईल. त्याचबरोबर सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी वाढवण्यात आली. त्यामुळे सोने-चांदी आणि प्लॅटिनम महाग होणार आहे.
याशिवाय येणाऱ्या काळात सिगारेटसाठी आणखी पैसे मोजावे लागणार आहेत. कारण अर्थसंकल्पात कस्टम ड्युटी १६ वाढवण्यात आली आहे. याशिवाय, सरकारने टेलिव्हिजनच्या खुल्या विक्रीच्या घटकांवरील कस्टम ड्युटी २.५ टक्के कमी केली आहे. ज्या उत्पादनांवर कस्टम ड्युटी वाढते, त्या वस्तू महाग होतात.
काय होणार स्वस्त?
एलएडी टिव्ही
कॅमेरा लेन्स
मोबाईल फोन टिव्ही
इलेक्ट्रोनिक गाड्या
खेळणी, सायकल
काय महागणार?
सिगारेट महागणार
विदेशी किचन चिमण्या महागणार
चांदीचे दागिने आणि भांडी महागणार
सोनं-चांदी, प्लॅटिनम महागणार