Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चाळीसगावातील एका गुन्हेगारावर मोक्काची कारवाई !
    क्राईम

    चाळीसगावातील एका गुन्हेगारावर मोक्काची कारवाई !

    editor deskBy editor deskJanuary 31, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    चाळीसगाव शहरातील निखील उर्फ भोला सुनील अजबे या गुन्हेगाराला एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत स्थानबध्द करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली आहे.शहरासह तालुक्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी दोन दिवसांपूर्वीत शहरातील एका गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या पाठोपाठ आता शहरातील नारायणवाडी भागातील रहिवासी निखील उर्फ भोला सुनील अजबे ( वय २१) या तरूणावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच एमपीडीएच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

    या संदर्भात पोलीस प्रशासनाने निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे की, निखील उर्फ भोला सुनिल अजबे वय-२१ वर्षे रा.नारायणवाडी, चाळीसगांव याच्या विरुध्द चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन येथे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, दुखापत यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपीस जुलै – २०२२ मध्ये दोन वर्षाकरिता जळगांव जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आलेले होते. हद्दपार कालवधी मध्ये देखील सदर आरोपीने हद्दपार आदेशाचे उल्लंघन करुन चाळीसगांव शहरात विविध गुन्हे केलेले होते. या अनुषंगाने आगामी काळात होणाऱ्या निवडणुका व विविध जाती-धर्माचे सण-उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी या आरोपींविरुध्द कठोर कारवाई करण्याबाबतचे आदेश पोलीस अधिक्षक रामकुमार यांनी जळगांव जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना दिलेले आहेत. या आदेशान्वये व अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे आणि सहा. पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक के. के. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोना/२८९७ विनोद भोई, पोना / ३१०५ तुकाराम चव्हाण अशांनी वर नमुद इसमाविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विना परवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळु तस्कर व अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणारी व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम १९८१ सुधारणा अधिनियम १९९६, २००९ व २०१५ चे कलम ३ (१) नुसार स्थानबध्द करणे बावतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला होता.

    स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील व त्यांचे सहकारी पोहेकॉ / दामोधरे यांनी तात्काळ पुढील कारबाई करुन सदर प्रस्तावावरुन दिनांक ३०/०१/२०२३ रोजी मा. जिल्हादंडाधिकारी सो. जळगांव यांनी वर नुमद इसमास स्थानबध्द करण्याबाबतचा आदेश काढला आहे. यामुळे सदर आरोपीला आज सपोनि. सागर ढिकले, पोना अमित बाविस्कर, पोकॉ अमोल भोसले, पोकॉ / रविंद्र वच्छे यांच्या पथकाने अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.