नवी दिल्ली ; वृत्तसंस्था
यूटरसला इन्फेक्शन झाल्यावर एक महिला नर्सिंग होममध्ये उपचार घेण्यासाठी गेली. तिथे डॉक्टरने तिच्या दोन्ही किडनी काढल्या आणि फरार झाला, त्या महिलेला तीन मुल आहेत. मोठ्या विश्वासाने ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती, तिथेच तिच्या दोन्ही किडनी चोरी करण्यात आल्या. इतकंच नाही तर ज्या पतीने आयुष्यभर साथ देण्याचं आश्वासन दिलं होतं तोही सोडून गेला.
तीन मुलं आहेत. मजुरी करून मुलांचं पालन पोषण करत होती. आता हॉस्पिटलमध्ये भरती आहे. शेवटचे दिवस मोजत आहे. माहीत नाही किती दिवस जगू शकेल. पण माझी चूक काय होती. माझ्यानंतर या मुलांचं काय होणा? ते कसे जगतील? बिहारच्या मुजफ्फरपूरच्या हॉस्पिटलमध्ये भरती सुनीतासोबत झालेली घटना वाचून अंगावर काटा येतो. मनात धस्स होतं. यूटरसला इन्फेक्शन झाल्यावर सुनीता एका नर्सिंग होममध्ये उपचार घेण्यासाठी गेली. तिथे डॉक्टरने तिच्या दोन्ही किडनी काढल्या आणि फरार झाला. आता सुनीतावर मुजफ्फरपूरच्या SK मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. तिची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. दर दोन दिवसांनी तिचं डायलिसिस करावं लागतं. अनेक लोक किडनी देण्यासाठी पुढे आले. पण मॅच होत नसल्याने तिचं ट्रांसप्लांट होऊ शकलं नाही.
सुनीताची मुलं आपल्या डोळ्यांनी आईला रोज मरताना बघत आहे. जेव्हाही सुनीताला भेटण्यासाठी कुणी येतं तेव्हा ती त्यांना एक प्रश्न विचारते की, या मुलांची काय चूक आहे? माझ्यानंतर यांचं काय होणार? काही दिवसांआधीपर्यंत तिचा पती अकलू राम तिच्यासोबत होता. तो किडनी देण्यासाठीही तयार होता. पण त्याची किडनी मॅच झाली नाही. काही कारणाने सुनीताचं अकलू रामसोबत भांडण झालं आणि तो तिन्ही मुलांना तिच्याकडे सोडून गायब झाला. जाता जाता त्याचे शब्द सुनीताच्या जखमां आणखी जास्त ओल्या करून गेले.
अकलू राम जाताना सुनीताला म्हणाला की, आता मी तुझ्यासोबत राहू शकणार नाही. त्यामुळे मी जात आहे. पतीसोबत झालेल्या भांडणाचा उल्लेख करत सुनीता रडत होती. ती म्हणाली की, जेव्हा तिची तब्येत चांगली होती तेव्हा ती स्वत: मजुरी करत होती. मुलांना काही कमी पडू देत नव्हती. पतीचे शेवटचे शब्द आठवत ती म्हणाली की, ‘जाताना तो म्हणाला होता की, आता तुझ्यासोबत जगणं अवघड आहे. तू मर किंवा जग मला त्याचं काही घेणं नाही’. सुनीताला याचीही भीती आहे की, तिचा पती आता तिला सोडून दुसरं लग्न करेल.
हॉस्पिटलमध्ये सुनीताची आई तिची देखरेख करत आहेत. त्या म्हणाल्या की, पती-पत्नीमध्ये काय वाद झाला यावर ती काहीच बोलणार नाही. तिने सांगितलं की, एक महिन्याआधीपर्यंत अकलू राम तिला किडनी देण्यासाठी तयार होता. पण ती मॅच झाली नाही.
हॉस्पिटलमधील लोक तिची मदत करत आहेत. पण जे डोनर मिळाले त्यांची किडनी मॅच होत नाहीये. मुजफ्फरपूरच्या बरियारपूर चौकजवळच्या खाजगी शुभकान्त क्लीनिकमध्ये 3 डिसेंबरला सुनीता देवीच्या यूटरसच्या ऑपरेशनऐवजी फेक डॉक्टरांनी तिच्या दोन्ही किडनी काढल्या होत्या. जेव्हा महिलेची तब्येत बिघडली तेव्हा डॉक्टर आणि क्लीनिकचे संचालक पवन तिथून फरार झाले. आरोप आहे की, डॉक्टरांनी तिची फसवणूक केली. पोलिसांनी पवनला अटक केली आहे.