नवी दिल्ली : वृत्तसंस्था
परिवारातील सातत्याने होणारे वाद मोठ्या टोकाला जात आहेत. अशीच एका पती आणि पत्नीमध्ये झालेले भांडण मोठ्या टोकाला जात एक धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात हि घटना समोर आली आहे.
पती-पत्नी वादातून भांडणं होणं ही काही नवीन बाब नाही. कधी कधी वाद वाढला तर एकमेकांना मारहाणही केली जाते. पण इथे रात्री घरी यायला इतका उशीर का झाला? असं विचारणाऱ्या पतीवर पत्नीने अॅसिडने हल्ला केला. ज्यामुळे पतीचा चेहरा गंभीरपणे भाजला गेला. पतीने पत्नीविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, कोपरगंजची ही घटना आहे. पत्नी रात्री उशीरा घरी आली तेव्हा पतीने तिला उशीरा येण्याचं कारण विचारलं. ज्यानंतर महिला संतापली आणि तिने पतीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकलं. अॅसिडमुळे पतीचा चेहरा गंभीर भाजला आहे. त्यानंतर त्याला मारहाणही केली. अशात पती नंतर पत्नीविरोधात तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे गेला. पोलिसांनी नंतर महिलेला अटक केली. तर पतीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
येथील डब्बू गुप्ता शनिवारी रात्री उशीरा जवळपास 3 वाजता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला होता. त्याचा चेहरा भाजलेला होता. डब्बूने सांगितलं की, पत्नी पूनम रात्री 12.30 वाजता घरी आली. त्याने तिला विचारलं की, इतक्या उशीरा कुठून आली. यावर पत्नी पूनम संतापली आणि ओरडायला लागली. त्यानंतर ती आणखी संतापली आणि तिने पतीला मारहाण सुरू केली. आपला बचाव करण्यासाठी पतीने हात-पाय चालवले. वाद इतका वाढला की, पत्नीने पतीला धक्का दिला आणि बाथरूममध्ये ठेवलेली अॅसिडची बॉटल घेऊन आली. बॉटलचं झाकणं उघडून तिने त्याच्या चेहऱ्यावर ते फेकलं. हे सगळं झाल्यानंतर डब्बू गुप्ता ओरडत ओरडत घराबाहेर पळाला. त्याला खूप वेदना होत होत्या. कसातरी तो पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि त्याने पत्नी विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसात लगेच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पत्नी पूनमला अटक केली.