लाईव्ह महाराष्ट्र न्यूज (प्रवीण पाटील) तालुक्यातील वसंतवाडी येथील नागरिकांसाठी ग्रामपंचायत मध्ये उद्या सकाळी८:३०वाजेला कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रम आयोजीत केला आहे.यासाठी नागरिकांनी आपल्या कागदपत्र सह उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
वसंतवाडी ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना आजाराच्या पाश्र्वभूमीवर सकाळी ८:३०वाजेपासुन लसीकरणला सुरुवात होणार आहे .लसीकरण केंद्रावर २५०डोस उपलब्ध होतील ते सर्व लस प्रथम डोस वाल्यानसाठी असतील अशी माहिती आरोग्य विभाग आरोग्य सेवक पिंजारी यांनी दिली हे लसीकरण यशस्वी होण्यासाठी वसंतवाडी ग्रामपंचायत सरपंच वत्सलाबाई पाटील, उपसरपंच ईश्वर चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रयत्नशील राहतील. तरी आपल्या वसंतवाडीतांडा गाव व जळके येथील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे यासाठी प्रत्येकाने आपले आभार कार्ड व मोबाईल नंबर आवश्यक आहे या लसीकरण केंद्रावर जळके आरोग्य उपकेंद्र येथील सि .एच.ओ.थोरात मॅडम,ए.एन.एम.सपकाळे मॅडम , आरोग्य सेवक सलीम भाऊ पिंजारी तसेच आशा वर्कर गोजर पाटील व सरीता पाटील हे कर्मचारी लसीकरण केंद्रावर उपस्थित राहतील.
ग्रामस्थांनी कोरोना नियमांचे पालन करावे व लसीकरण केंद्रावर सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायत तर्फे करण्यात आले आहे.