जळगाव : प्रतिनिधी
शहरातील मुख्य चौकात एका २५ वर्षीय महिलेचा एकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील सुभाष चौक परिसरात दि २९ रोजी दुपारच्या सुमारास शहरातील एका परिसरातील २५ वर्षीय महिला रस्त्याने चालत असतांना एका रिक्षात महिलेची साडी अडकून गेली त्यामुळे साडी फाटल्याने महिलेने संबधित रिक्षाचालकाला जाब विचारला असता संशयित आरोपी गयासोद्दीन रफीओद्दीन शेख याने महिलेची माफी न मागता उलट महिलेला अश्लील शिवीगाळ करीत महिलेच्या अंगावर धावून गेला व महिलेचा हात धरीत तिच्या कानाखाली मारून तिला लोटून दिले. या प्रकरणी फिर्यादी महिलेने तत्काळ शनिपेठ पोलीस स्थानक गाठत संशयित आरोपी गयासोद्दीन रफीओद्दीन शेख (वय ४८, रा.उस्मानिया पार्क, खत कारखाना जवळ जळगाव) याच्या विरोधात विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सफौ.मनोज इंद्रेकर हे करीत आहेत.