जळगाव : प्रतिनिधी
गोद्री ता.जामनेर येथे होणाऱ्या अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा लबना व नायकडा समाज कुंभ 25 ते 30 जानेवारी दरम्यान सूरू आहे. परंतु समाजाचा कार्यक्रम हा सरकारी खर्चाने कसा काय होत आहे. या कुंभाच्या नावाने मोठा भ्रष्टाचार होत आहे असे खुद्द बंजारा समाजाच्या राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या सदस्यांनी केला आहे. यात मंत्री गिरीश महाजन यांच्या ठेकेदाराचे खिसे याद्वारे भरले जात आहे अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.
गोद्री ता.जामनेर येथे अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा लबना व नायकडा समाज कुंभ 25 ते 30 जानेवारी दरम्यान सुरू आहे. सोमवारी या कुंभाचं शेवटचा दिवस असून या कुंभात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मंत्री उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या कुंभाच्या च्या कार्यक्रमातून काय राजकीय फटकेबाजी देखील लक्ष लागून असणार आहे.
करोडाचा आर्थिक भ्रष्टाचार
गोद्री कुंभात हा तात्पुरता कार्यक्रम सरकारी खर्चाने होत आहे. यात समाजाच्या नावाने मोठा भ्रष्टाचार होत आहे. तसेच या कार्यक्रमासाठी तात्पुरत्या सेवा नावाखाली करोडो रुपयांचा यात भ्रष्टाचार होत आहे असे आरोप सर्वत्र होत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय बंजारा टायगर्स च्या वतीने संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री आत्माराम जाधव हे पत्रकार परिषद घेत कुंभ मेळाव्यात समाजाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे केलेले आहे.
कुंभमेळाव्याच्या नावाखाली भाजप दाखवतेय शक्ती
कुंभमेळाव्याचे आयोजनाची जबाबदारी ही राष्ट्रीय सेवक संघाकडे दीलेली आहे. कुंभ मेळाव्यात भाजपचे मंत्री, आमदारांपासून तर कार्यकर्ते या जुटलेले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारी भाजपकडून ही शक्ती दाखवले जात आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.