Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » फेसबुकवर मैत्री, परदेशी मुलीने बांधली भारतीयाशी लग्नगाठ !
    राज्य

    फेसबुकवर मैत्री, परदेशी मुलीने बांधली भारतीयाशी लग्नगाठ !

    editor deskBy editor deskJanuary 29, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    प्रेम म्हटले कि कोणताही धर्म, जात हे कुणीही पाहत नसते पण या प्रेमवीरांची कहाणी जरा वेगळी आहे. तरुणीने आपला देश सोडून चक्क १० वर्ष सुरु असलेल्या प्रेमासाठी भारतात आली आहे. उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील अवगढ या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या 30 वर्षीय पवन कुमारने शुक्रवारी स्वीडनच्या क्रिस्टल रेबर्गसोबत लग्नगाठ बांधली. 2012 मध्ये पवन कुमारने स्वीडनमधील रहिवासी असलेल्या क्रिस्टल रेबर्गशी फेसबुकवर मैत्री केली आणि त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पवन कुमार हा व्यवसायाने इंजिनिअर आहे, तर क्रिस्टल रेबर्गने स्वीडनमधून हॉटेल, टुरिझम आणि मार्केटिंगमध्ये डिप्लोमा केला आहे. याविषयी पवन म्हणतो की,10 वर्षांपूर्वी 2012 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून आमची मैत्री झाली या मैत्रीचं प्रेमात रूपांतर कधी झालं हे आम्हालाही कळलं नाही.

    दरम्यान, 2018 मध्ये पवन आणि क्रिस्टलनेही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सुरुवातीला पवनचे कुटुंबीय लग्नासाठी तयार नव्हते. स्वीडनमध्ये राहणाऱ्या एका ख्रिश्चन मुलीशी तो विवाह कसा करू शकेल याची कुटुंबीयांना भीती वाटत होती. दुसरीकडे लग्न झाले तरी लग्नानंतर यश मिळेल का? परदेशी मुलगी भारतीय परंपरेनुसार जुळवून घेईल का? पण पवन कुमारने कुटुंबीयांची समजूत घातल्यानंतर ते परदेशी मुलीशी लग्न करण्यास तयार झाले.

    पवनने जुलै 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत DRDO च्या इन्स्ट्रुमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (IRDA) लॅबमध्ये रिसर्च फेलो म्हणून काम केले. सध्या तो आणि त्याची पत्नी दोघेही बेरोजगार आहेत. यापूर्वी क्रिस्टल स्वीडनमध्ये किचन स्टोअरमध्ये काम करत होती. लग्नानंतर या नवविवाहित दाम्पत्यांना चांगलं भविष्य घडवायचं आहे, असे पवनचं म्हणणं आहे. मला स्वीडनला जाऊन नोकरी करायची आहे. भारतात नोकरी हवी होती, पण मिळू शकली नसल्याचे त्याने सांगितले. पवन सांगतो की, क्रिस्टलसोबतच्या 10 वर्षांच्या मैत्रीमध्ये ती सहा ते सात वेळा भारतात आली आहे. त्यांचे लग्न हिंदू परंपरेनुसार पार पडले यावर क्रिस्टलला कोणताही आक्षेप नव्हता.
    आम्ही स्वीडनमध्ये ख्रिश्चन परंपरेनुसारही लग्न करणार आहोत असं पवनचं म्हणणं आहे. दोघांमध्ये लग्नादरम्यान धर्म बदल वगैरे कुठलीही चर्चा झाली नाही. लग्नानंतरही क्रिस्टल ख्रिश्चन आणि पवन हिंदूच राहणार आहेत. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की त्यांच्या लग्नात धर्माचा अडथळा नाही का, तेव्हा तो म्हणाला की, आता आमच्यात 10 वर्षांची मैत्री आहे, दोघेही एकमेकांना खूप वर्षांपासून समजून घेत आहेत. म्हणूनच धर्म हा आमच्यासाठी अडथळा नाही, कारण खरा धर्म मानवता आहे. एकंदरीतच एटाहच्या अवगढ शहरात झालेल्या या लग्नाची आजूबाजूच्या अनेक गावात जोरदार चर्चा होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.