जळगाव (प्रतिनिधी ) सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी तात्काळ करावी या मागणी साठी आज ९ ऑगष्ट क्रांतिदिनीं शाहिद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटनेतर्फे एकदिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले. यात बंद केलेली पेन्शन विक्री योजना सुरु करावी, वर्ग ३,४ च्या कर्मचारी वर्गाला कालबद्ध पदोन्नत्या लागू करणे,२००५ नंतर बंद केलेली पेन्शन लागू करणे, आकृती बंद प्रस्तावानुसार नोकर भरती त्वरित करावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. जळगाव महानगर पालिका कामगार युनियन आणि अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस आदी संघटनाचाही या कामबंद आंदोलनात सहभाग होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, अनिल नाटेकर, गुरुनाथ सैंदाणे, प्रफुल्ल पाटील आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.