पुणे : वृत्तसंस्था
एका ३७ वर्षीय तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष देत तिच्यावर अत्याचार करीत तिच्याकडून लाखो रुपये लुटल्याची घटना उघडकीस आली आहे.
कोथरूड परिसरातील ३७ वर्षीय तरूण तपन अनंत थत्ते याने एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करीत वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली पाच लाख रुपये उकळल्याची घटना पुण्यातील कोथरुड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका युवकावर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तपन थत्ते याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तसेच आई आजारी असल्याचे सांगून तिच्या उपचारासाठी तातडीने पैशांची गरज असल्याचे सांगून तरुणीकडून पाच लाख रुपये उकळले.
तरुणीने आरोपीकडे पैशांची मागणी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच पीडित तरुणीला शिवीगाळ करुन धमावले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी तपन थत्ते याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील करीत करीत आहेत.