जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून सुरु असलेली गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी अट्टल गुन्हेगारांना आता जिल्हा पोलिसांनी चांगलीच अद्दल शिकवीत आहेत. जिल्ह्यात महिन्याभरापासून गुन्हेगारावर मोक्क्याची कारवाईची आजची चौथी घटना आहे. आजच्या या कारवाईत चाळीसगाव तालुक्यातील ५ टोळीतील ११ सदस्यांना मोक्का लावलेला आहे.
चाळीसगाव शहर पो.स्टे. गु.र.नं. ४८५/२०२२ भादंवि क, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९,१२०(२) या गुन्हयांतील आरोपी टोळी प्रमुख) अमोल उगन गायकवाड वय २५ रा. स्वामी समर्थ कॉलनी, नागद रोड, चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव, B) (टोळी सदस्य) २) सुमित ऊर्फ बाबा अशोकराव भोसले रा. नागद रोड, चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव, (अटकपूर्व जामीनावर) ३) कृष्णा उगन गायकवाड रा. नागद रोड, चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव, ४) संतोष ऊर्फ संता पहेलवान रमेश निकुम रा. हिरापुर ता. चाळीसगाव जि. जळगाव, ५) विक्की ऊर्फ शुभम विजय पावले वय २३ रा. हिरापुर ता. चाळीसगाव जि. जळगाव, ६) श्याम ऊर्फ सॅम नामदेव चव्हाण वय २४ रा. हिरापुर ता. चाळीसगाव, ७) सचिन सोमनाथ गायकवाड वय २२ रा.बाबाजी चौक चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव, ८) जयेश दत्तात्रय शिंदे (पाटील) वय २४ रा. भोरस खुर्द ता. चाळीसगाव जि. जळगाव, ९) उद्देश ऊर्फ गुड्डू सुधिर शिंदे वय २४ रा. हिरापूर ता. चाळीसगाव जि.जळगाव, १०) योगेश रतन पांचाळ (पडवळकर) वय २६ रा. हिरापूर ता. चाळीसगाव जि. जळगाव, १९) पुष्पराज ऊर्फ सुनिल जगताप रा. पिंपळखेड ता. चाळीसगाव जि.जळगाव (फरार) गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्हयांतील आरोपीतांनी यापूर्वी टोळीने आर्थिक फायदयासाठी घरे गुन्हे केलेले असल्याचे चाळीसगाव शहर पो.स्टे. अभिलेखावर दिसून आले.
त्याप्रमाणे जळगाव पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, उपविभाग यांनी श्री. किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव व श्री. कांतीलाल पाटील, पोलीस निरीक्षक, चाळीसगाव शहर पो.स्टे. यांना योग्य ते मार्गदर्शन करून सदर टोळीवर वरील दाखल गुन्हयांत मोक्का कायदयाचे कलम वाढविण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे श्री. अभयसिंह देशमुख, सहा. पोलीस अधीक्षक यांनी मोक्का प्रस्ताव तयार करून स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या मार्फत मा.पोलीस अधीक्षक सो. जळगाव कार्यालयात दि.२२/०१/२०२३ रोजी सादर केला. मा.श्री.एम. राज कुमार, पोलीस अधोक्षक, जळगाव यांचेकडे प्रस्ताव प्राप्त झालेनंतर मा. पोलीस अधीक्षक सो यांनी प्रस्तावाचे अवलोकन करुन दि. २१/०१/२०२३ रोजी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो. नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे कडेस प्रस्तावर सादर केला. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी प्रस्तावाचे अवलोकन करुन वरील आरोपीतांनी टोळीने केलेल्या गुन्हे अभिलेख तपासणी करून सदर गुन्हयांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे क. ३(१)(II), ३(२), ३(४) (मोक्का) हे कलम लावण्याची परवानगी दि. २५/०१/२०२३ रोजी दिल्याने चाळीसगाव शहर पो.स्टे. वरील गुन्हयांतील वरील आरोपीतांवर मोक्का कायदयाखाली कलम लावण्यात आलेले आहे.
सदर प्रस्ताव कामी श्री. किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वागुशा, जळगाव व त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सफी युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे तसेच चाळीसगाव शहर पो.स्टे. श्री. कांतीलाल पाटील, पोलीस निरीक्षक, सहा. पो. निरी. श्री. विशाल टकले यांनी योगदान दिले आहे.