जळगाव : प्रतिनिधी
धरणगाव शहरातील २६ जानेवारीच्या दिवशी ग्रामसेवकाने लाच घेतल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले या घटनेला दोन दिवस होत नाही तोच जिल्ह्यातील एका पोलीस कॉन्स्टेबलने आपल्या पंटरच्या माध्यमातून लाच घेणे भोवले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव ग्रामीण भागातील अडावद पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने एक पंटरच्या माध्यमातून चार हजारांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. वाळू व्यावसायिकाकडून ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करू देण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्याने ही कारवाई झाली आहे.
वाळूचे ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करू देण्यासाठी व कोणतीही कारवाई न करण्यासाठी तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारणार्या अडावदमधील पोलीस कर्मचार्यास जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल योगेश गोसावी व खाजगी पंटर चंद्रकांत कोळी असे अटकेतील आरोपींचे नावे आहेत. तक्रारदार यांनी कर्जाद्वारे ट्रॅक्टर घेतले असून वाळू वाहतूक करू देण्यासाठी व कारवाई न होण्यासाठी गोसावी यांनी पाच हजारांची लाच मागितली मात्र चार हजारात तडजोड झाल्यानंतर तक्रारीअंती सापळा रचण्यात आला. अडावद पोलीस स्टेशन आवारात खाजगी पंटरने लाच स्वीकारताच गोसावी यांनाही अटक करण्यात आली. एसीबीचे उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला.