Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बायकोला लागली नवऱ्याच्या अफेअरची भनक ; झोपेत करून बसली असे काम !
    क्राईम

    बायकोला लागली नवऱ्याच्या अफेअरची भनक ; झोपेत करून बसली असे काम !

    editor deskBy editor deskJanuary 28, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पालघर : वृत्तसंस्था 

    राज्यात अनैतिक संबंधाच्या संशयावरून नवऱ्याने बायकोला संपविले अशा घटना तुम्हा एकल्या असतील पण हि घटना जरा उलट आहे. चक्क महिलेने आपल्या पतीला संपविले आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

    पालघरमध्ये एका महिलेने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित महिलेला तिच्या पतीचे अफेअर असल्याची भनक लागली होती. यानंतर तिने काही लोकांच्या मदतीने पतीची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी 36 वर्षीय महिलेसह इतर 4 जणांना हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव संतोष टोकरे असल्याचे समजते. झोपत्यावेळी त्याची हत्या करण्यात आली. 20 जानेवारीच्या रात्री 10 वाजण्याच्या सुमारास वाडा तालुक्यातील कोंडले-बंदनपाडा गावात संबंधित युवक मृतावस्थेत आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मृतदेहाच्या तपासणीत गळा दाबून संतोषची हत्या केल्याचे समोर आले आहे. याशिवाय त्याच्या डोक्यालाही दुखापत झाल्याचे समोर आले आहे. त्याच्या डोक्यावर एखाद्या धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची शक्यता आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, मृत व्यक्तीचे एका दुसऱ्या महिलेसोबत अफेअर सुरू होते. याची भनक त्या व्यक्तीच्या पत्नीला लागली. यामुळे ती प्रचंड संतापली होती. यानंतर तिने तिच्या पतीला मारण्याचा प्लॅन तयार केला आहे. यानंतर चार आरोपींच्या मदतीने तिने संतोषची हत्या केली. सध्या पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.