जळगाव : प्रतिनिधी
शहरातील पंचमुखी हनुमान मंदीर परीसरात असलेल्या रामदेवबाबा मंदीरासमोर अज्ञात दोन इसमांनी एका व्यापारी असलेल्या वृद्धाची ८ लाखात लुट केल्याची घटना जळगावात घडली होती, त्याठिकाणी तत्काळ पोलीस पथक दाखल झाले होते. त्यानंतर एमआयडीसी पोलीस स्थानकाने आज २७ रोजी यातील पाच संशयित आरोपीना ताब्यात घेतले आहे.
काय घडली होती घटना !
दिनांक 23 जानेवारी रोजी रात्री ९.२५ वाजेच्या सुमारास श्री.ईश्वर बारुमण मेघाणे, रा सिंधी कॉलनी, रामाराम नगर, जळगाव हे त्यांचे दाणा बाजार येथील बाबा हरदासराम ट्रेडर्स हे होलसेल मालाचे दुकान बंद करुन उधारीचे व दिवसभरात दुकानातील माल विक्री करुन मिळालेले असे एकुण ८ लाख रु. एक लॅपटॉप, मोबाईल, चार्जर, हार्डडिस्क, पेनड्राईव्ह, दुकानातील डायरी असे एका बॅगमध्ये टाकुन त्यांचे मोटारसायकलने घरी जात असतांना जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदीर परीसरात असलेल्या रामदेवबाबा मंदीरासमोर अज्ञात दोन इसमांनी एका मोटारसायकलने पाठीमागुन येवुन त्यांचे मोटारसायकलला कट मारला, त्यामुळे फिर्यादी यांची मोटारसायकल हळु झाल्यानंतर जवळच उभ्या असलेल्या एका इसमाने फिर्यादीने मोटारसायकल वर समोर ठेवलेली बॅगबळजबरीने हिसकावुन त्याच्याच साथीदाराच्या मोटारसायकलवर बसत तेथुन पळ काढला होता. या हकीकत वरुन एम.आय.डी.सी. पो.स्टे. ला गुरनं. 32/2023 भादवि कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील आरोपीतांचा तात्काळ शोध घेवून गुन्हा उघडकीस आणणेबाबत पोलीस अधिक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक व स्था.गु.शा. जळगाव यांना सुचना दिल्या होत्या. त्यावरुन पोलीस निरीक्षक, किसन नजनराव पाटील, स्था.गु.शा. जळगाव, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, एम.आय.डी.सी. पो.स्टे., जळगाव यांनी वेगवेगळे पथक नेमुन आरोपीतांचा शोध घेणे सुरु केले.
स्थागुशा चे पोहेकॉ सुधाकर अंभोरे, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, पो.ना. विजय पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे अशांनी फिर्यादीचे दुकानावर काम करणार संशयीत मुलास ताब्यात घेतले, त्याचे कडेस अधीक विचारपुस केली असता त्यानेच इतर साथीदारांना टिप दिल्याचे कबुल केले होते. त्याचवेळी एम.आय.डी.सी. पो.स्टे. चे पो.उप.निरी आनंदसिंग पाटील, स.फौ. अतुल वंजारी, पो.हे.कॉ. विजय पाटील, गणेश शिरसाळे, सचिन मुंढे, रामकृष्ण पाटील, अल्ताफ पठाण, पो.ना. इम्रान सैय्यद, सुधीर सावळे, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, विकास सातदिवे, मुदस्सर काझी, पो.कॉ. मुकेश पाटील, छगन तायडे, किरण पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी, साईनाथ मुंढे, सतिष गर्जे अशांचे तिन वेगवेगळे पथक तयार करुन त्यांनी गुन्हयातील इतर चार आरोपीतांना ताब्यात घेतले, ताब्यात घेतलेल्या चारही आरोपीतांनी गुन्हयाची कबुली देत गुनहयात वापरलेले दोन्ही मोटारसायकल हजर केल्या आहे. वरील पाचही आरोपीतांना दिनांक २७ रोजी रोजी 00:35 वा. गुन्हयात अटक करण्यात आली असुन गुन्हयामध्ये दरोड्याचे कलम वाढविण्यात आले आहे. सदरचा गुन्हा स्था.गु.शा. जळगाव व एम.आय.डी.सी. पो.स्टे. अशांनी संयुक्त रित्या उघडकीस आणला आहे. पुराव्या दृष्टीने आरोपीतांची ओळख परेड घेणे आवश्यक असल्याने त्यांना बुरखा घालून त्यांची ओळख उघड होणार नाही याबाबतची सर्व दक्षता घेत त्यांना न्यायालयात न्यायालयीन कस्टडी मिळणेकामी हजर केले आहे. सदर गुन्हयाचा तपास पो.उप.निरी. आनंदसिंग पाटील करीत आहेत.