जळगाव : प्रतिनिधी
येथील सिंहगड कॉलनी मध्ये राहणारे हवालदार निलेश मल्हारराव देशमुख यांनी भारतीय सेना दलात आपली कामगिरी पार पाडताना भारत पाकिस्तान सीमेवर 19 डिसेंबर 2020 रोजी पाकिस्तानी अड्ड्यावर 84 मिलि मीटर रॉकेट लॉंच करून फायर केले. त्यात पाकिस्तानी दोन आतंकवादी जागीच ठार झाले व दोन जखमी झाले.
या कामगिरीबद्दल त्यांना 26 जानेवारी 2022 रोजी सेना मेडल मिळाल्याचे घोषित करण्यात आले. व ते मेडल 15 जानेवारी 2023 रोजी भारतीय सेना दिवसानिमित्त बेंगलोर येथे निलेश मल्हारराव देशमुख यांना सेना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले त्याबद्दल सिंहगड कॉलनीतील सर्व रहिवाशांनी मिळून त्यांचा सत्काराचे आयोजन केले त्यात शेखर पवार, कैलास ठाकूर, भूषण पाटील, महेश कोळंबे, दशरथ देशमाने, चेतन महाजन, राम निकम, मोहन गायकवाड, महावीर जहांगीर, प्रीतम शिरतुरे, राजपूत, हळकुंडे, राकेश शर्मा, दिनेश सुर्वे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू केंद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन धीरज राणे यांनी केले. या कार्यक्रमाला सिंहगड कॉलनीतील लहान मुले वृद्ध व महिला सर्व उपस्थित होते.