अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करीत पोलीसानी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मिळालेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या ४५ वर्षीय महिलेच्या घरी जात तुझ्या मुलगीशी माझे लग्न करायचे आहे असे विचारात तिला शिवीगाळ करून निघून गेला. त्यानंतर फिर्यादी महिला शौचास बाहेर जात असताना रस्त्यावर थांबून तिला पुन्हा मला तुझी मुलीशी लग्न करायचे आहे असे बोलून वाईट उद्देशाने फिर्यादी महिलेचा हात पकडत तिच्यासोबत मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी संशयित आरोपी हेमंत प्रकाश पवार (वय २३) याच्या विरोधात अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ. सुनील पाटील हे करीत आहे तर अमळनेर पोलिसांनी संशयित आरोपीला तात्काळ अटक केली आहे