नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात काही भागात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले असतांना अगदी क्रूरपणे खून होत आहेत. त्याला कारणही असेच काही धक्कादायक समोर येत आहे. गोरखपुरमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. ज्याबद्दल समजल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे. राजघाट पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या खुर्मपुर परिसरामध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली असून त्याने पत्नीला अशाप्रकारे मृत्यूच्या दाढेत ढकललं की ते ऐकून पोलिसही हादरले आहेत.
उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये एक विचित्र मर्डर केस समोर आली आहे. आरोपीने आपल्या पत्नीची हत्या केली. गळा आवळून पत्नीची हत्या केल्यानंतर ही व्यक्ती स्वत: पोलीस स्थानकात गेली आणि तिने केलेल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. पोलीस स्थानकामध्ये जाऊन या व्यक्तीने लेखी तक्रार देत मी माझ्या पत्नीची हत्या केली असून तिचा मृतदेह घरात पडलेला आहे, असं सांगितलं. हे सारं ऐकून पोलिसांनाचा मोठा धक्का बसला. पत्नीची हत्या केलेल्या व्यक्तीने तिचे एका मुलाबरोबर अनैतिक संबंध होते असा आरोप केला आहे. मला हे अजिबात सहन व्हायचं नाही. म्हणूनच मी रागाच्याभरात तिचा गळा दाबला आणि तिची हत्या केली, असं या आरोपीने सांगितलं. गोरखपूरमधील खुर्मपुरमध्ये हा सारा प्रकार घडला. हा परिसर राजघाट पोलीस स्थानकाच्या अंतर्गत येते.
आरोपीन पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याच्या पत्नीचे एका मुलाबरोबर अनैतिक संबंध होते. ज्या मुलाबरोबर तिचे अनैतिक संबंध होते तो माझ्या मुलाच्या वयाचा आहे, असंही हा आरोपी पोलिसांना म्हणाला. हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव नीलम असं असून ती 47 वर्षांची होती. पोलिसांनी नीलमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आरोपी पतीचं नावं चंद्रपाल असं आहे. चंद्रपाल पूर्वी स्कूल बस चालवायचा. कामानिमित्त चंद्रपाल बाहेर असायचा तेव्हा पत्नीचा प्रियकर घरी यायचा अशी त्याला शंका होती.
मी अनेकदा पत्नीला त्या मुलाबरोबर रंगेहाथ पकडलं आहे. अनेकदा मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र माझ्या पत्नीने माझं काहीही ऐकलं नाही, असं चंद्रपाल म्हणाला. पत्नीच्या या वागण्यामुळे चंद्रपाल फारच अस्वस्थ होता. अनेकदा या मुद्द्यावरुन चंद्रपाल आणि नीलममध्ये भांडणं व्हायची. एकदा हा वाद एवढा टोकाला गेला की संतापलेल्या चंद्रपालने गळा दाबून नीलमची हत्या केली. चंद्रपाल आणि नीलम यांना दोन मुलं आहेत. मुलगी सध्या ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेत आहे. तर मुलगहा दहावीला आहे. चंद्रपालने ज्या दिवशी आपल्या पत्नीची हत्या केली तेव्हा मुलगी कॉलेजला तर मुलगा शाळेत गेला होता. राजघाट पोलीस स्थानकाचे प्रमुख राजेंद्र सिंह यांनी आरोपी स्वत: पोलिसा स्थानकात आला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती दिली.