धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील वराड खुर्द या गावात असलेले गट नंबर १०० शेतकऱ्याने शेत जमिनीवर चारी मारलेली होती त्यामुळे या परिसरातील शेतकरी यांना जाण्या-येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने संबधित शेतकरी यांनी तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्याकडे अर्ज केला होता त्याच अर्जाची दखल घेत. दि २४ रोजी ती चारी बुजविण्याचे आदेश करण्यात आले होते. यावर मंडळ अधिकारी अमोल पाटील यांनी कारवाई केली आहे.
या परिसरातील शेतकरीना शेतात जाण्यासाठी ट्रॅक्टर, गहू काढण्याचे मशीन तसेच बैलगाडी या रस्ता नसल्याने गट नंबर 100 च्या एका शेतकऱ्याने या रस्त्यावर जेसीबीच्या साह्याने चारी मारून ठेवली होती त्यामुळे शेतकऱ्यांना येथून ये-जा करणे जिकरीचे झाले होते यासंबंधी तक्रार शेतकरी अंकुश तुकाराम पाटील, अशोक दयाराम पाटील, लक्ष्मण देवराम पाटील यांनी तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्याकडे केली होती. याबाबत तहसीलदार देवरे यांनी आदेश करीत ती चारी दि २४ रोजी बुजवण्याचे आली आहे. याप्रकरणी घटनास्थळी पाळधी मंडळ अधिकारी अमोल पाटील वराड खुर्दचे तलाठी केबी पवार यांच्यासह तीन पंचांसमोर त्या शेतातील चारी जेसीबीच्या साह्याने बुजवण्यात आली असा पंचनामा या ठिकाणी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यासमोर करण्यात आलेला आहे. यामुळे आता येथील शेतकरी ना हा रस्ता येण्या जाण्यासाठी खुला ही करण्यात आला असल्याने शेतकऱ्यांनी एकच आनंद व्यक्त केला आहे.