मुंबई : वृत्तसंस्था
२०१९ मध्ये पहाटेच्या शपथविधीस अजित पवार व देवेद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन करून दोन्ही नेत्यांनी शपथ घेतली होती. या शपथविधीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, जयंत पाटील यांनी दावा केलाय की पहाटेचा शपथविधी शरद पवारांची खेळी असू शकते. असे गौप्यस्फोट जयंत पाटील त्याचवेळा का करत नाहीत, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. तसेच उशिरा सुचलेलं शहाणपण काहीच महत्त्वाचे नाही, असंही पाटील म्हणाले. बाबासाहेब आंबेडकर यांना घटनास्थापन करण्याची जबाबदारी दिली होती. २६ जानेवारी रोजी आपण ती स्वीकारली. काही झाल्यावर, काय करावं हे त्यांनी लिहलंय. त्यामुळे आतापर्यंत घटनात्मक पेच निर्माण झाला नाही.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. पाटील म्हणाले, देवेंद्रजी अलीकडे राज्यातील असे नेते झाले की लहान वयात त्यांनी विश्वास निर्माण केला. ते माहिती नसताना काहीच बोलत नाहीत. माझ्या सारख्या लोकांनी त्यांच्याकडून शिकले पाहिजे. मी काहीतरी बोलतो आणि नंतर दिलगिरी व्यक्त करतो, अशी कबुलीही पाटील यांनी दिली.