जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या एका २० वर्षीय तरुण विवाहितेचा एका २३ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पहूर पोलीस स्थानकात संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, जामनेर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या २० विवाहित तरुणीला संशयित आरोपी जीवन अंबादास दांडगे यांनी दि ३ डिसेंबर ते १५ जानेवारी २०२३ दरम्यान विवाहितेला तिच्या फोटोचा धाक दाखवीत व तुझ्या पतीसह तुझ्या वडिलांना मारून टाकण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी संशयित आरोपी जीवन अंबादास दांडगे याच्या विरोधात पहूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी संदीप चेडे हे करीत आहेत.