Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : मुख्यमंत्री शिंदेंसोबत उपमुख्यमंत्री दिल्लीत दाखल !
    राजकारण

    मोठी बातमी : मुख्यमंत्री शिंदेंसोबत उपमुख्यमंत्री दिल्लीत दाखल !

    editor deskBy editor deskJanuary 24, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्यातील शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तार लवकर होईल या आश्वासनात हिवाळी अधिवेशण देखील आटोपून गेले पण आतापर्यत मंत्री मंडळ विस्तार झालेला नाही पण आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. या दौऱ्यात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    दिल्लीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी यासंबंधीची महत्त्वाची बैठक केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत पार पडणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळ विस्ताराची अंतिम यादी हाती येऊ शकते. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासंबंधीची महत्त्वाची बैठक आज दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात होत आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावरील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व मोडीत काढण्यासंबंधी रणनीती आज ठरवली जाण्याची शक्यता आहे. यासाठी साखर उद्योगातील महत्त्वाचे भाजप नेते दिल्लीत उपस्थित आहेत. दुपारी चार वाजता ही बैठक आहे. अमित शाह यांच्या नॉर्थ ब्लॉक कार्यालयात ही बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेच राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
    राज्यातील मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्याकडे शिंदे गट तसेच भाजपातील आमदारांचं लक्ष लागलंय. पहिल्या टप्प्यातील विस्तारात वर्णी न लागलेल्या इच्छुकांचे डोळे दिल्लीच्या दिशेने लागले आहेत.

    शिंदे गटातील आमदारांमध्ये संजय शिरसाट, योगेश कदम, प्रताप सरनाईक, संजय गायकवाड, सुहास कांदे, भरत गोगावले यांचा समावेश आहे. मंत्रिपदाचं आश्वासन मिळालेले अपक्ष आमदार बच्चू कडूही खातेवाटपाच्या प्रतीक्षेत आहेत. तर भाजपच्या गोटातून संजय कुटे, आशिष शेलार, गोपीचंद पडळकर, राम शिंदे, नितेश राणे, देवयानी फरांदे, प्रवीण दरेकर आदी नावांची मंत्रिपदासाठी चर्चा आहे.
    राज्याच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे तो झाला नसल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. तर शिवसेना पक्षाविषयी महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्ट तसेच निवडणूक आयोगाकडे सुरु आहे. या सुनावणीतील घडामोडींनुसार, मंत्रिमंडळ विस्तार होईल, असेही म्हटले जात होते. मात्र आज दिल्लीतील बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.