धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पाळधी येथे हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची 97 व्या जयंती निमित्त पाळधी येथे बाळासाहेबांची शिवसेनेच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी आरोग्य तपासणी शिबिर तसेच रात्री ह भ प संजय पवार आळंदीकर महाराज यांचे कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला सदरील कार्यक्रम प्रसंगी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे पाळधी बुद्रुकचे सरपंच प्रकाश पाटील पाळधी खुर्द चे सरपंच शरद कोळी सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गोसावी यांच्या हस्ते बाळासाहेबांचे पूजन करण्यात आले. नेताजी सुभाष चंद्र बोस यांचीही जयंती असल्याने ज्येष्ठ शिवसैनिक गोकुळ पाटील प्रशांत झंवर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी शिबिरामध्ये 415 रुग्णांची मोतीबिंदू शुगर बीपी हृदयरोग अशा विविध तपासण्या करण्यात आल्या.
25 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी सरकारी रुग्णालय जळगाव येथे पाठवण्यात आले सदर कार्यक्रमाला बाळासाहेबांची शिवसेना मागासवर्गीय सेना गुलाबराव पाटील फाउंडेशन मुक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते कीर्तन शिबिर प्रसंगी शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील अनिल माळी माजी सरपंच अरुण पाटील उपसरपंच चंदन कळमकर, तुषार मोरे मिलिंद नन्नवरे सुनील भोई बापू चौधरी संजय मोरे गोपाल सोनवणे नाना पाटील सर बंडू दादा नारखेडे सुरेश पाटील नारायण सोनवणे चंदू इंगळे सोपान पाटील आदींचे सहकार्य लाभले. तर शिबिर प्रसंगी आर्यन हॉस्पिटल व सिविल हॉस्पिटल जळगाव यांचे डॉक्टर अविनाश शिरोडे स्वप्निल पालवे विठ्ठल मोरे मधु गोलकर डॉक्टर गौरव चौधरी डॉक्टर नरेंद्र पाटील अतुल नन्नवरे डॉक्टर नितीन सोनवणे यांनी रुग्णांची तपासण्या करून रुग्णांचे समाधान केले.