• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावातील एका गॅंगला मोक्का ; नाशकात केले स्थानबद्ध !

editor desk by editor desk
January 24, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावातील एका गॅंगला मोक्का ; नाशकात केले स्थानबद्ध !

जळगाव : प्रतिनिधी 

जिल्हा पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाईचा सपाटाच लावला आहे. एमपीडीएच्या महिनाभरात ४ कारवाया झाल्या आहेत. सोमवारी भुसावळ येथील एकावर एमपीडीए करण्यात आल्यानंतर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच जणांच्या एक गॅंगला मोक्का लावण्यात आला आहे. त्यांना नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.

जिल्हा पोलिसांकडून सर्वसामान्यांना उपद्रवी ठरणाऱ्यांवर एमपीडीए आणि मोक्कानुसार कारवाई केली जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकाने खुनाच्या गुन्ह्यातील एका गॅंगवर मोक्का कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांनी प्रस्तावाला सोमवारी मंजुरी दिली असून ५ जणांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील टोळी प्रमुख मोनूसिंग जगदीशसिंग बावरी, मोहनसिंग जगदीशसिंग बावरी, सोनूसिंह जगदीशसिंग बावरी, सतकोर जगदीशसिंग बावरी, जगदीशसिंग हरीसिंग बावरी सर्व रा.सिकलकर वाडा, शिरसोली नाका यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मोक्काच्या गुन्ह्यातील सर्व गुन्हेगार सध्या कारागृहात असून त्यांना मोक्का कायद्यानुसार नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या नेतृत्वाखाली जळगाव पोलिसांकडून दमदार कारवाई सुरू असून सराईत गुन्हेगारांना धडकी भरली आहे.

Previous Post

जळगावात व्यापाऱ्याचे ८ लाख घेवून चोरटे फरार

Next Post

तरुणांना संधी : ८ हजार जागांची मेगा भरती

Next Post
तरुणांना संधी : ८ हजार जागांची मेगा भरती

तरुणांना संधी : ८ हजार जागांची मेगा भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group