Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राजकारण तापणार : एकाच व्यासपिठावर ठाकरेसह शिंदे येणार !
    राजकारण

    राजकारण तापणार : एकाच व्यासपिठावर ठाकरेसह शिंदे येणार !

    editor deskBy editor deskJanuary 23, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यातील राजकारण तापणार असल्याची दाट शक्यता आहे. ते म्हणजे एकाच व्यासपीठावर उद्धव-राज ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री फडणवीस येणार आहे. विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे.

    उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्याचबरोबर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. त्याचप्रमाणे पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा देखील आज पहिल्यांदाच सामना होऊ शकतो. त्यामुळे आज या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    आज संध्याकाळी 6 वाजता विधान भवनाच्या पाचव्या मजल्यावरील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने हे अनावरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा पार पडणार आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. शिवसेनेचे 40 आमदार शिंदेंसोबत गेल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. आम्हीच खरी शिवसेना आहोत असेही शिंदे गटाने म्हणायला सुरु केले. शिंदे आणि ठाकरे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यामुळे त्यांच्यातील दरी दिंवसेंदिवस वाढतच गेली.
    नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेतील चर्चेत भाग घेतला. मात्र त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही याठिकाणी उपस्थित नव्हते. त्यामुळे हे तीन नेते अजूनपर्यंत समोरासमोर आलेले नाहीत. आज विधान भवनात बसवण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरण समारंभात तिघे सोबत येतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

    यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती असेल. सकाळी उद्धव ठाकरे रिगल सिनेमासमोरील शिवसेनाप्रमुखांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करतील. त्यानंतर ते दादरच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी दादरच्या आंबेडकर भवनात येऊन प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करतील. नंतर उद्धव ठाकरे हे संध्याकाळी षण्मुखानंद येथे होणाऱ्या शिवसैनिकांच्या मेळाव्यालाही संबोधित करणार आहेत. त्यामुळे विधान भवनातील कार्यक्रमाला उद्धव ठाकरे हजेरी लावणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.