लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव शहरातील प्रभाग क्रमांक 4 शिंपी समाज मंगल कार्यालया मधे आयोजित लसीकरण मोहीम घेण्यात आली
या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष निलेश आबा चौधरी , उपनगराध्यक्ष ,विलास महाजन,नगरसेवक भागवत चौधरी वासुदेव चौधरी,सुरेश महाजन डाक्टर,आरोग्य अधिकारी किरण पाटील, डाँक्टर मयुर जैन, सिस्टर मोरवकर,सोनवणे,सहकारी भदाने,महेंद्र महाजन बडगुजर, इत्यादी, आरोग्य विभाग कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .
शहरातील प्रभाग 4 मधील शिंपी समाज कार्यालयात लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजक, नगरसेवक, गट नेता विनय पप्पू भावे, नगरसेविका अंजली भानुदास विसावे,यांनी केले होते.या मोहिमेत पहिला डोस 492, दुसरा डोस 223 कोविड शिल्ड, आणि दुसरा डोस को व्याकसिंन 78 येवढे डोस चे लसीकरण करण्यात आले.
लसीकरण यशस्वी करण्यासाठी सत्यनारायण चौक,युवा सेना,पदाधिकारी, भगसिंह मित्र मंडळ , बडगुजर गल्ली शिवसेना, पदाधिकारी सुदर्शन भागवत,मोहन मांडगे,किरण सोनवणे, अनिल बडगुजर, वासुदेव बडगुज, सचिन बडगुजर, खुशाल मांडगे, सागर जगताप चेतन शिंपी राज जगताप, गणेश मराठे, मयूर बागुल, मंगेश सोनवणे, मनोज नेरपगार, हेमंत चौधरी, प्रशांत जगताप, जितेंद्र जगताप, यांनी जनजागृती करून यशस्वी कार्येक्रम केला,शिवसेना धरणगाव ने प्रभाग नुसार शंभर टक्के लसीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे,
कार्यक्रमात मान्यवरांचा आणि आरोग्य विभागातील डॉक्टर,नर्स व कर्मचारी यांचा सत्कार नगरसेवक विनय भावे, नगरसेविका अंजली विसावे यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.यापुढेही पुडील डोस साठी आमचा प्रयत्न राहणार असल्याचे सह संपर्क प्रमुख गुलाब राव वाघ, शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमात सुदर्शन भागवत यांनी आभार मानले,कार्यक्रम यशवी संपन्न झाला.