• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पुणे हादरल : मनसे जिल्हाध्यक्षावर गोळीबार !

editor desk by editor desk
January 22, 2023
in क्राईम, राज्य
0
पुणे हादरल : मनसे जिल्हाध्यक्षावर गोळीबार !

पुणे : वृत्तसंस्था

पुण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील राहत्या घरासमोर हा प्रकार घडला. या गोळीबारात सुदैवाने जीवितहानी झाली नाही आहे. मागील अनेक वर्षांपासून समीर थिगळे मनसेत कार्यरत आहेत. कुख्यात गुंडानी हा गोळीबार केला आहे. कुटुंबीयांसमोरच गोळीबार केल्याने परिसरात आणि कुटुंबात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

मागील काही वर्षांपासून समीर हे मनसेत कार्यरत आहे. पक्षाच्या कामात ते चांगलेच सक्रिय आहेत. त्यांची पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरनिवड केली होती. राज ठाकरेंनी त्यांना नियुक्तीपत्र दिलं होतं. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर, हवेली या तालुक्यांची त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. पुण्यात आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये देखील मनसे सक्रीय होत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणीही करण्यात आली आहे.

गुंडानी समीर यांना धमकी दिली. त्यासोबतच पैशाची मागणीदेखील केली. “मी खेडचा भाई आहे. एकाला घालवलाय, तुलाही माज आलाय संपवतोच तुला”, असं म्हणत पिस्तुल रोखून समीर थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. त्यानंतर या गुंडांनी गोळीबार केला. गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. समीर थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी करणाऱ्या आरोपीवर याआधीही खुनाचा गुन्हा दाखल असून तो सध्या जामीनावर बाहेर आहे.

कुख्यात गुंडाने समीर यांच्या दिशेनं गोळी चालवण्याचा प्रयत्न केला, मात्र पिस्तुलातून गोळी सुटलीच नाही. यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र त्यानंतर दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांनी हवेत गोळीबार केला. यावेळी समीर थिगळे यांचं कुटुंब घटनास्थळी हजर होतं. गुंडानी त्यांंच्यासमोरच समीर यांना धमकावण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळावरुन पळ काढला. या सगळ्या घटनेत मात्र कोणालाही इजा झाली नाही. याप्रकरणी राजगुरुनगर पोलिसांत मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला करत शस्त्राचा वापर करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून राजगुरूनगर पोलीस या गुंडांचा शोध घेत आहेत. हे गुंड मोक्कातील आरोपी असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.

Previous Post

धरणगावचा तुषारसाठी मित्रासह पोलीस निरीक्षक राहुल खताळा यांची मदत !

Next Post

नागपुरात भाजप नेत्याच्या पुत्राविरोधात गुन्हा दाखल !

Next Post
नागपुरात भाजप नेत्याच्या पुत्राविरोधात गुन्हा दाखल !

नागपुरात भाजप नेत्याच्या पुत्राविरोधात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group