धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव येथील होमगार्ड तुषार दगडू पाटील याला अप्लॅ्टीक ॲनिमिया नावाचा दुर्मिळ आजार झाला असून त्यासाठी त्याला ऑपरेशन साठी चाळीस लाख रुपये लागत आहेत तो मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला आहे घरची परिस्थिती अतिशय बिकट असून त्याच्या उपचारासाठी त्याच्या मित्र परिवाराने सोशल मीडियावर तसंच शहरात गाठीभेटी घेऊन मदतीसाठी निधी गोळा करीत आहेत यावेळी धरणगाव चे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना मित्र व परिवाराने भेट दिली असता त्यांनी सदरहून मदत म्हणून अकरा हजार रुपयाची मदत केली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुंजाळ, सुनील चौधरी, कमलेश तिवारी, राजेंद्र पवार, गणेश चौधरी उपस्थित होते.
सदरहून तुषार पाटील हा धरणगाव येथील होमगार्ड पथकामध्ये कार्यरत असून त्याने पोलीस भरतीसाठी अतिशय मेहनत केली होती परंतु अचानक ऐन भरतीच्या वेळी त्याला अप्लॅस्टिक ॲनिमिया नावाचे इन्फेक्शन झाले आणि उपचारासाठी मुंबई येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल झाला आहे. त्यासाठी धरणगाव पोलीस भरती ग्रुप धरणगाव आर्मी बॉईज ग्रुप व मित्र परिवार यांच्यावतीने उपचारासाठी निधी गोळा करीत आहेत.तरी जास्तीत जास्त नागरिकांनी मदत करावी असे आवाहन यावेळी मित्र परिवाराने केली आहे.