जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातून अल्पवयीन मुलीस अनोळखी इसमाने पळवून नेल्या प्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील दौलत नगर परिसरातील रहिवासी असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी इसमाने दि २० रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एका मंदिराजवळून पळवून नेल्या प्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात अल्पवयीन मुलीच्या वडिलानी धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सफौ.संजय चौधरी हे करीत आहेत.