जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशन येथे दिनांक 21 जानेवारी रोजी अचानक दहशतवादी घुसले त्यांनी सुरक्षारक्षकांवर गोळीबार करत काहींना थांबवून ठेवले या घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलीस आणि दहशतवादी यांच्यामध्ये जोरदार चकमक झाली अखेर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवून चारही दहशतवाद्यांना जेरबंद करण्याचा ठराविक प्रसंग जळगाव शहरातील भारत पेट्रोलियम कार्पोरेशन येथील तील कर्मचाऱ्यांनी कथन करून सांगितला मात्र हा हल्ला खरोखरचा नव्हे तर ते जळगाव जिल्हा पोलीस दलाचे मॉकड्रील(प्रात्यक्षिक) हे माहिती पडल्यावर सर्व कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला.
सविस्तर वृत्त असे की शहरातील एमआयडीसी बागात असलेल्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशन येथे दिनांक 21 रोजी सकाळी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान काही दहशतवादी हल्ल्याप्रसंगी करावयाचे प्रात्यक्षिक जिल्हा पोलीस दलाच्यावतीने सादर करण्यात आले हुबेहूब दहशतवादी गोळीबार अन होणारा पोलीस बंदोबस्त अशा या थरारक प्रात्यक्षिक आणि सर्वच भारावून घेतले होते पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या सूचनेनुसार आज दिनांक 21 रोजी शनिवारी हे प्रात्यक्षिक घेण्यात आले होते.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
चार दहशतवादी यांनी भारत पेट्रोलियम कंपनीमध्ये गेटमधून प्रवेश करीत त्यानंतर तेथील सुरक्षारक्षकांवर गोळीबार केला कंपनीने ही माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी दहशतवादी हल्ला विरोधी शाखेचे पथक एमआयडीसी पोलीस ठाणे किंवा आरती पथक बॉम्बशोधक व नाशक श्वानपथक आरसीपी प्लाटून पोलीस फॉरेन्सिक युनिट स्थानिक गुन्हे शाखा अग्निशमन बंब रुग्णवाहिका यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी या ठिकाणी लागलीच काही वेळात पोहोचले पोलीस कर्मचाऱ्यांनी परिस्थितीवर नियंत्रणात आणली काही दहशतवाद्यांनी येथील कर्मचाऱ्यांना व नागरिकांना अडकवून ठेवले होते त्यांना सुखरूप सोडविले व दहशतवाद्यांना सीताफिने अटक केली असा थरारक प्रात्यक्षिक या ठिकाणी घडले अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास पोलिसांनी काय करावे नागरिकांनी प्रसंग वदन राखून कशी काळजी घ्यावी याबाबत प्रात्यक्षिकद्वारे माहिती देण्यात आली. तसेच असा प्रसंग उद्भवल्यास पोलीस नियत्रण कक्ष फोन नंबर ०२५७-२२२३३३३ व डायल ११२ वर संपर्क साधावा असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आला आहे.