धरणगाव : प्रतिनिधी
पाळधी बु येथील शेतकरी दिनांक 19 जानेवारी रोजी रस्त्याबाबत कैफियत घेऊन तहसीलदार धरणगाव नितीनकुमार देवरे यांच्याकडे आले असता तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन दुसऱ्याच दिवशी सदर रस्त्याचे स्थलनिरीक्षण केले.यात श्री सागर संजय अग्रवाल रा.जळगाव यांनी एन ए केलेल्या क्षेत्रालगत शेतकऱ्यांचा जुना वहिवाट रस्ता बंद केला होता यामुळे शेतकऱ्यांची जा ये बंद झाली होती.सदर बाबीची पाहणी करून तहसीलदार देवरे यांनी सदर शेतकरी अग्रवाल यांना समजावत एका बांधावरील शेतकरी रुपचंद ठाकरे यांचेकडून 4 फूट व सागर अग्रवाल यांचे शेतातून 8 फूट असा 12 फुटाचा रस्ता शेतकऱ्यांसाठी अवघ्या अर्ध्या तासात खुला करून दिला.
त्यामुळे शेतकरी बांधांवामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले होते.सर्व शेतकऱ्यांनी तहसीलदार देवरे यांच्या तत्परतेचे व ऑन दि स्पॉट फैसल्याचे तोंडभरून कौतुक केले.याप्रसंगी तलाठी प्रशांत पाटील कोतवाल राहुल शिरोळे व शेतकरी हजर होते.
मला कालच या समस्येबाबत माहिती मिळाली आणि मी आज जाऊन पाहणी केली असता शेतकऱ्यांना समजावून सांगितले व रस्ता खुला केला.शेतकरी बांधवांसाठी व समस्या सोडविण्यासाठी तहसिल प्रशासन बांधील आहे.
– तहसीलदार नितीनकुमार देवरे